Anil Athalye
Miss you forever
कविवर्य भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून.
आज माझा भाऊ अनिल आठल्ये याची पुण्यतिथी
जन पळभर म्हणतील हाय हाय.....
पण आमची मने (मात्र)म्हणतील......
मन हर पळ म्हणतील ,हाय हाय
तू जाता राहिली ,एकटी रे माय
सूर्य मावळतील, चंद्र झाकोळतील
उल्का होउनी ,तारे ही गळतील
वारे अपुला मार्ग भुलतील
होईल सर्वत्र अंतराय
मेघ आटतील, पिके करपतील
अवर्षणाने नद्या सुकतील
मनात हुरहूर की न उमटतील
पुन्हा अवनीवर तुझे ते पाय
जरी न डोळे आता भरतील
जगरहाटी सुरूच राहील
मने बापुडी मूक रडतील
तू जाता आमुचे सर्वस्व जाय
आमच्यासाठी तू न कुढावे
मोही संसाराच्या नच गुंतावे
आत्माने तव मुक्तीस जावे
चिरशांतीची लेउनी साय
@ विजय आठल्ये.१ नोहेंबर २०१७